Media control news network
कोल्हापूर दि. २७ :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माझी वसुंधरा अभियांना अंतर्गत हरित कायद्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कामगार अधिकारी राम काटकर, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, विधी अधिकारी संदीप तायडे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
____________________जाहिरात______________________