
कोल्हापूर दि,१५ . मिणचे खुर्द- सामाजिक कार्यकर्ते मा.तुकाराम देसाई यांच्या पत्नी सौ.सुप्रिया तुकाराम देसाई रा.मिणचे खुर्द यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीमुळे मिणचे खोऱ्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तुकाराम देसाई हे गेले अनेक वर्षे सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करत आहेत.मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात त्यांचा लक्षणीय सहभाग असतो.त्यांनी समाजातील अनेक गरजूना आपल्या कार्यातून मदत करत असतात.छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना प्रेरणास्रोत मानून ते आपले कामं करत आहेत. तुकाराम देसाई यांचे जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या पत्नीच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिकच चालना मिळाली.विशेष म्हणजे सुप्रिया देसाई यांच्या माध्यमातून मिणचे खोरीत पहिल्यांदाच महिलेची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झालेली आहे. ही नियुक्ती हे एकनिष्ठतेचे फळ असल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली.
सुप्रिया देसाई यांच्या या निवडीमागे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,राज्यसभा खासदार मा.धनंजय महाडिक,भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक,भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील,युवक नेते देवराज बारदेस्कर,धनंजय महाडिक युवाशक्ती भुदरगड तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
__________________जाहिरात ___________________

____________________ जाहिरात___________________

