Media control news network
कोल्हापूर दि.१७. आज केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता भाजपा जिल्हा कोल्हापूरच्या वतीने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक यांची उपस्थिती होती. भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. विजय जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागाळा पार्क कोल्हापूर येथे डॉ. नुपूर पाटील यांच्या लॅबचे उद्घाटनप्रसंगी येथे आले होते.
____________________जाहिरात _____________________

