Media control news network
कोल्हापूर /प्रतिनिधी , पतंजली योग पीठाचे संस्थापक, योगऋषी रामदेवबाबा शनिवारी कोल्हापुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत महिला महासंमेलन पार पडले. तत्पूर्वी बाबा रामदेव यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्यावतीने स्वामीजींना श्री अंबाबाईची मूर्तीची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, सन्मती मिरजे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह श्रीपूजक उपस्थित होते
Advertisements

