कॉमर्स कॉलेजमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून “विज्ञान” शाखेला मान्यता.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर दि. ८ : कॉलेज ऑफ कॉमर्सला विज्ञान शाखेला मान्यता देण्यात आली आहे.

Advertisements

 येत्या २०२५ शैक्षणिक वर्षापासून येथे बीएस्सी, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विषयांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. संस्थेचे

सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी ही माहिती दिली. नव्याने सुरू होणाऱ्या शास्त्र शाखेसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज वर्गखोल्या, ग्रंथालय आणि डिजिटल सुविधा, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वसतिगृह सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, संचालक ॲड. प्रसाद बाडकर, संचालक ॲड. वैभव पेडणेकर,  यावेळी उपस्थित होते.

 गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी

विद्यार्थ्यांचा नेहमीच पहिला प्राधान्यक्रम राहिलेल्या या महाविद्यालयात नव्याने सुरू (सायन्स) विभागामुळे नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि व्यावसायिक संधीचे दालन खुले होणार आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. वर्षा मैदर्गी यांनी केले आहे 

     ———————- जाहिरात———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *