कोल्हापूर प्रतिनिधी ,प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. मेन्स फँशन शो मध्ये याचे सादरीकरण झाले. त्या विरोधात ललित गांधी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरने तातडीने इटली येथील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
प्राडा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी महाराष्ट्र चेंबरला पत्रव्यवहार केला आहे. कोल्हापूरची ओळख आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापुरी चपलेची जगभरात ओळख आहे. अलीकडेच प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. तसेच मेन्स फँशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केला गेला.
ही चप्पल इटालियन असल्याचे भासविले गेले. या प्रकाराने प्राडावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवण्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केला.
प्राडा कोल्हापुरीसारखी हुबेहूब चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे तर, भारतीय कारागीर तीच चप्पल ४०० ते १५०० रुपयांत बनवतात. या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणारे कारागिरांत नाराजी होती. राज्यातील काही कारागीरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील आणि जगाची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलाची अस्मिता जाणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीकडे पत्रव्यवहार करुन वस्तुस्थिती मांडली अखेर त्यांना मान्य करावे लागले. प्राडामध्ये वापरलेल्या चप्पल हे कोल्हापुरीच
——————— जाहिरात————————