Media control news network
पेठ वडगाव (प्रकाश कांबळे) विशेष वृत्त
मोहरम उत्सवातील पेठ वडगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या हुसेन बादशहा सवारीची स्थापना धार्मिक वातावरणात करण्यात आली.
मोहरम उत्सवातील मानाची पहिली भेट दिनांक 03/07/25 रोजी रात्री 08.00 वाजता बेबी फातिमा (मसूद माँ) सवारीशी सुतार गल्ली येथे होणार असून दुसरी मानाची भेट दिनांक 04/07/25 रोजी रात्री 10.00 झिमझिम साहेब सवारी शी घुमट चौक येथे होणार आहे.
दिनांक 05/07/25 रोजी खत्तलरात्र कार्यक्रम होणार असून या दिवशी सर्व भाविक भक्त दर्शनासाठी कोल्हापूर सांगली, कराड,सातारा, कर्नाटक रत्नागिरी, चिपळूण, पुणे, मुंबई येथून येत असतात यावेळी खाई फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतो
दिनांक 06/07/25 रोजी मोहरम उत्सवातील ताबूत विसर्जन कार्यक्रम होतो.
या मोहरम उत्सवात सवारीची देखभाल आदिलशहा फकीर, कबीर फकीर व राजू फकीर हे करतात तर हजेरी अरूनबाबा पाडळकर व रमेशबाबा माळी हे घेतात संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी मोहरम उत्सवाचे संयोजन टी टी एम ग्रुप उत्साहाने करतो.
यावेळी रजनिकांत धोंगडे,सुप्रसिध्द ताशा वादक नेताजी जाधव,विश्वनाथ कावडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.