Share Now
शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांचे नाव राधाबाई. कोल्हापूर न्यायालयाची जी मूळ इमारत आहे त्या इमारतीपैकी ही एक इमारत. येथे दिवाणी न्यायालय भरत होते. काळाच्या ओघात न्यायालयाची जागा बदलण्यात आली. आणि या वास्तूच्या वाट्याला जणू एकांतवासाची शिक्षाच आली. एरव्ही रात्री तर एका ट्यूब लाईटच्या प्रकाशात ही वास्तु अधिकच गंभीर दिसु लागली. सगळेजण म्हणायचे, ही वास्तु जपायला हवी. पण या वास्तूचे भाग्यच उजळले आणि सर्किट बेंचच्या निमित्ताने या वास्तुचे संवर्धन झाले. आता लोक थांबून ही वास्तू पाहू लागले. ज्या राधाबाईंचे नाव या वास्तूला आहे त्या राधाबाई कोण असे विचारू लागले. खूप सुंदर रचना असलेल्या या वास्तुचे वैभव संवर्धनामुळे पुन्हा खुलले. या वास्तूला सर्किट बेंच च्या निमित्ताने कोल्हापूरकर भावनिक साद घालत न्याहाळत होते अशा अनेक वास्तू कोल्हापुरात आपल्या आसपास आहेत. कदाचित त्या वास्तुंचा इतिहास, जपल पाहिजे.
———————जाहिरात———————–
Share Now