कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली,

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 0 Second

कोल्हापूर, दि. २० : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली या दरम्यान पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

तसेच कोल्हापूर शहरालगत बावडा – शिये मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग ये- जा करण्यासाठी वापरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

पंचगंगा नदीने राजाराम बंधारा येथे आज बुधवारी पहाटे इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील तसेच पूरबाधित भागातील नागरिकांना सतर्कतेचे तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सद्य परिस्थितीत नद्यांचा जलस्तर वाढू शकतो आणि पाणी पातळीत वाढ होवू शकते.

यासाठी जिल्ह्यात रस्ते बंद झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात. नदी, ओढ्यांच्या काठच्या नागरिकांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन कोणतीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांची माहिती

 

दिनांक 20 ऑगस्ट, रात्री 9.30 वाजता

➡️ KMC निवारा केंद्र..

चित्रदुर्ग मठ

➡️एकूण कुटुंब 9

पुरुष 9

स्त्री 11

लहान मुले 9

लहान मुली 6

एकूण 35

➡️ स्थलांतरित झालेले ठिकाण..

सुतारवाडा

पंचगंगेची पाणी पातळी 41.10 फुटांवर

 

पंचगंगा नदीची 20 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 41. 10″ फूट (542.94m) आहे.

विसर्ग 61549 cusecs

(नदी इशारा पातळी 39″ व धोका पातळी 43″)

जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

केर्ली फाटा आणि वडणगे फाटा दरम्यानच्या परिसरात देखील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक शिवाजी पूल – वडणगे फाटा – वडणगे – निगवे दुमाला – जोतिबा रोड – वाघबिळ – रत्नागिरी या मार्गाने वळवण्यात आली आहे.

धरणांची विसर्ग माहिती

राधानगरी – 8640 क्युसेक

दूधगंगा – 18600 क्युसेक

वारणा – 24090 क्युसेक

कोयना – 95300 क्युसेक

अलमट्टी – 250000 क्युसेक

हिप्परगी – 125969 क्युसेक

——————— जाहिरात———————–

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *