Media Control news network
कोल्हापूर दि. ९, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२५ यंदाचे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. या मध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग समाचारचे स्वर्गीय संपादक काका कदम यांचे सुपुत्र येथील मँगो एफ.एम. रेडीओ प्रसारण केंद्राचे व दैनिक सिंधुदुर्ग समाचार प्रमुख संपादक आशिष (दादा) कदम यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तसेच राजीव साबडे, युवराज पाटील, बसवेश्वर चेनगे, जीवनधर चव्हाण, शंतनू डोईफोडे, विजय पालकर, त्यांच्यासह अनेकांची पुरस्कारासाठी नावे घोषित करण्यात आले आहेत.

संपादक आशिष कदम (दादा) यांच्यावर
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संस्था, हितचिंतक, पत्रकार, मित्रपरिवार यांच्याकडून ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यासह राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हा कार्यक्रम ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त होणार आहे.
==========जाहिरात=============
