” मी एक जिप्सी ” या दोन खंडातील ग्रंथांचे प्रकाशन डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते संपन्न

Media control news network

कोल्हापूर प्रतिनिधी,भारत सरकारचे निवृत्त परराष्ट्र सचिव व ज्येष्ठ साहित्यिक मा.डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनकार्यावर आधारित मा.सायली सत्यजीत वैद्य यांनी लिहिलेल्या ” मी एक जिप्सी ” या दोन खंडातील ग्रंथांचे प्रकाशन  मा. डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

Advertisements

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी संयुक्त विद्यमाने केले होते.यावेळी डॉ.मुळे यांच्या व्यक्तिगत, शासकीय, सामाजिक, साहित्यिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या या ललित ग्रंथावर भाष्य करण्याची व त्याचे अंतरंग उलगडून दाखविण्याची संधी संजय मुळे यांना मिळाला मिळाली.यावेळी डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांचेही अतिशय बोधप्रद मार्गदर्शन झाले. ग्रंथाच्या लेखिका सायली वैद्य यांचे मनोगतही वाचून दाखविण्यात आले. संजय घायतिडक, संजय मुळे , प्रकाश गौड यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करून मुख्याधिकारी बनलेल्या मा. तन्मय अनिल मांडरेकर यांचा डॉ .ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संजय घायतिडक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.नेमिनाथ कोथळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.मा. मीनाक्षी तंगडी यांनी सूत्रसंचालन केले. संजय मुळे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  जाहिरात  जाहिरात  जाहिरात  जाहिरात 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *