राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर
•   १५ महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

Dio, दि. २२ :- राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून २९ महापालिकांपैकी १५ महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकच पद आरक्षित होत आहे. नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पद देय होत नाही. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३ पदे आरक्षित झाली असूनत्यापैकी २ पदे अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी ८ पदे आरक्षित झालेली असूनत्यापैकी ४ पदे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत.

Advertisements

उर्वरित १७ महानगरपालिकांमधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी ९ पदे येत असून,  ८ पदे खुला (सर्वसाधारण) या प्रवर्गासाठी आहेत.

महापौर पदासाठी आरक्षण

अनुसूचित जमातीसाठी राखीव महापालिका – कल्याण-डोंबिवली

अनुसचित जातीसाठी राखीव महापालिका – ठाणे (सर्वसाधारण)जालना (महिला)लातूर (महिला).

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षण) – जळगावचंद्रपूरअहिल्यानगरअकोला.

नागरिकांचा मागास प्रवर्ग  (सर्वसाधारण) – पनवेलइचलकरंजीकोल्हापूरउल्हासनगर.

सर्वसाधारण महिला आरक्षण – पुणेधुळेबृहन्मुंबईनवी मुंबईनांदेड-वाघाळामालेगावमीरा- भाईंदरनागपूरनाशिक.

सर्वसाधारण प्रवर्ग – छत्रपती संभाजीनगरपरभणीसांगली-मिरज-कुपवाडअमरावतीवसई-विरारसोलापूरपिंपरी-चिंचवडभिवंडी-निजामपूर

==========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *