शिवाजी विद्यापीठासाठी प्रलंबित ५० कोटी निधीची मागणी
खासदार महाडिकांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला

Media control news network 

कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापुरमधील शिवाजी विद्यापीठाच्या विकासकामांसाठी मंजूर असलेल्या प्रलंबित निधीबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि तातडीने निधी मिळावा अशी मागणी केली.

Advertisements

विद्यापीठाला केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विविध योजनांसाठी निधी मंजूर झाला असून, मात्र सुमारे ५० कोटी रुपयांचा मोठा हिस्सा अद्याप विद्यापीठाकडे पोहोचलेला नाही.

विद्यापीठातील नाविन्यपूर्ण योजनेसाठी ५७.१४ लाख रुपये, वैयक्तिक संशोधन प्रकल्पांसाठी १३.१२ लाख रुपये, हिंदी विभागासाठी २५.३२ लाख रुपये, तसेच विविध विभागांच्या अध्यासनांसाठी ३ कोटी रुपये प्रलंबित आहेत. अकरावी योजनेअंतर्गत ६.४२ कोटी रुपये आणि बाराव्या योजनेअंतर्गत ९.५७ कोटी रुपये येणे बाकी आहे.

विद्यापीठाच्या वतीने मागणी केल्याप्रमाणे, महाडिक यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला असून, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे.

विद्यापीठातील प्रलंबित निधीच्या तातडीच्या वितरणानंतर शैक्षणिक विकास आणि संशोधन प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *