युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य बनला पत्रकारांसाठी आधार; जीवनावश्यक वस्तूची वाटप

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 25 Second

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सध्या देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार देखील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांप्रमाणे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पत्रकार नागरिकांच्या पर्यंत नेहमीच आपल्या लेखणीतून बातम्या पोचवत असतो परंतु लॉकडाउन च्या काळात पत्रकारांच्या – कडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. पत्रकार देखील एक माणूस आहे त्यांचादेखील परिवार आहे.

 सध्या आर्थिक गणित कोलमडली आहे, पत्रकार आपला जीव धोक्यात टाकून वृत्तांकन करत आहेत. आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे युवा पत्रकार संघ यांच्या वतीने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील पत्रकारांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून जिल्ह्यातील पत्रकारांना दिलासा दिला.
यावेळी मास्क बांधून व सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, यांनी युवा पत्रकार संघा तर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सांगली, सातारा, बीड, मुंबई, नाशिक, शिर्डी, रत्नागिरी, यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांना अडचणीच्या काळामध्ये काळजी करू नका ,दक्षता घ्या असे संदेश देत जीवनावश्‍यक वस्तूंची मदत व धीर देत आहेत.
तसेच महाराष्ट्र सरकार कडून संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार बांधव व भगिनींना आर्थिक मदत पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकवण्यासाठी मदत करावी , अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी पत्रकारांनी स्वावलंबन स्वीकारून निर्भीड पत्रकार बना ,असे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष जावेद देवडी, राज्यउपाध्यक्ष सुशांत पोवार, जिल्हा सचिव शरद माळी, खजानीस बाबुराव वळवडे,नवाब शेख, अरुण शिंदे, दतात्रय देवणे, दीपक नायडू, प्रियांका राऊत, दिनेश चोरगे, रोहित वज्रमट्टी, नियाज जमादार, राजेंद्र सूर्यवंशी, कमलाकर सारंग, रवी कोल्हटकर, मुबारक अत्तार,सुलोचना नार्वेकर, नितीन ढाले, नारायण सुतार, ऐश्वर्या पवार, सतीष चव्हाण, गणेश वाईकर, संतोष पोवार, सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते. यावेळी कोमल शिंगे यांनी आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *