बनावट पासच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल

कोल्हापुर विशेष प्रतिनिधी शरद माळी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4.0 सुरू असताना लोकांना प्रवास करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई पास ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा काही लोक गैरवापर करत आहे.

  आज रोजी वडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशाच पद्धतीने एक टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक MH-04 GP 1097 हे वाहन येथे आले असता, त्या वाहनाची तपासणी करताना त्यावरील चालक खुर्शीद मोहम्मद जान मोहम्मद शेख राह. पितांबर लाईन कटोरी माहीम याने प्रशांत या नावाच्या व्यक्तीशी संगणमत करून, मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी संचारबंदी च्या काळात पारित केलेल्या पास मध्ये फेरफार करून बनावट पास खरे असल्याचे प्रदर्शित करून शासनाची फसवणूक केली व चालक नामे खुर्शिद जान याने आपल्या ताब्यातील वाहनावर बनावट पास चिटकवून ताब्यातील वाहनात प्रवासी बसवून प्रवास करताना मिळून आला. सदर बाब निदर्शनास आल्याने, प्रशांत राह. नालासोपारा चालक व खुर्शीद जान राह. पितांबर लाईन कटा कटोरी माहीम यांचेवर वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि प्रशांत निशाणदार हे करत आहेत.
तसेच इसम नामे आशिष चौरसिया राहणार नगर चेंबूर या इसमाने व चालक नामे मंगेश सुरेश कासारे राहणार नालंदा नगरी घाटकोपर मुंबई यांनी आपसात संगणमत करून इसम नामे अशिष चौरशिया राहणार पेस मत सागर चेंबूर यांनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांचे कार्यालयातून संचार बंदीच्या काळात मिळालेल्या प्रवास पास मध्ये फेरफार करून सदरचे बनावट पास खरा असल्याचे प्रदर्शित करून शासनाची फसवणूक केली व त्याद्वारे मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करताना वाहन क्रमांक MH-03 CV 4774 मध्ये मिळून आल्याने, त्यांच्यावर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Advertisements

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक खान हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *