Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : आज दिवसभरात १४४८ प्राप्त अहवालापैकी ३६ अहवाल पॉझीटिव्ह तर १४११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण २१८ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ६९ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज दिवसभरात आलेल्या ३६ पॉझीटिव्ह अहवालामध्ये आजरा-१ , भुदगरड-४ , चंदगड-७ , गगनबावडा-२., राधानगरी-१, शाहूवाडी-१५ आणि महानगरपालिका क्षेत्रात-६ असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ११ , भुदरगड- २२, चंदगड- १३, गडहिंग्लज- ५ , गगनबावडा- ४ , हातकणंगले- १, कागल- १, करवीर- १० , पन्हाळा- १३ , राधानगरी- ३५ , शाहूवाडी- ६९ , शिरोळ- ४, नगरपरिषद क्षेत्र- ७, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१९ असे एकूण २१४ आणि पुणे-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण २१८ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.