कोल्हापूर महानगरपालिका के.एम.टी. कर्मचारी कौतुकाने भारावले.

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 43 Second

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या के.एम.टी. चालक-वाहक कर्मचाऱ्यांचा जवाहरनगर येथील “विश्वकर्मा हौसिंग सोसायटी” परिसरामध्ये पुष्पवृष्टी करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

 कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्याच्या प्रवेश मार्गावर किणी टोल नाका, अंकली नाका, कोगनोळी टोल नाका, इ. ठिकाणी दाखल होणाऱ्या नागरिकांना तपासणीसाठी सी.पी.आर येथे नेणे, तसेच तपासणी नंतर आवश्यकतेनुसार निवारा केंद्रामध्ये पोहोचविणे, मनपाकडील आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी पोहोचविणे, फिरता दवाखाना संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी पोहोचविणे इ. कामगिरी के.एम.टी.उपक्रमाकडून अहोरात्र पार पाडली जात आहे.
यामध्ये चालक वाहक व यंत्रशाळा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे के.एम.टी. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप भुर्के, माजी नगरसेविका पद्मजा भुर्के यांच्या संकल्पनेतून विश्वकर्मा हौसिंग सोसायटी” परिसरामध्ये सन्मान करणेत आला.
यावेळी अति.परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई, सहा.वाहतूक निरिक्षक बी.बी. चंदन, वाहतूक नियंत्रक संजय कोळी, प्रमोद पाटील, अरविंद हुक्किरे आदि के.एम.टी. कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते जगमोहन भुर्के, अनिरुध्द भुर्के, सोनिया जामसांडेकर, श्रावणी पोतदार, प्रियांका भुर्के, शुभांगी पेडणेकर यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *