आता काळ्या पैशाच्या वापराला बसणार आळा; प्राप्तीकर विभागाकडून शीघ्र कृतीदल स्थापन

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 13 Second

निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराची माहिती मिळाल्यास करा तक्रार; सहसंचालक (अन्वेषण) पुर्णेश गुरूरानी यांचे आवाहन

सांगली/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा निवडणूकीत काळ्या पैशांचा वापर होवू नये, यासाठी प्राप्तीकर विभागाच्या तपास महासंचालनालयाच्या वतीने शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच अहोरात्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. निवडणुकीसाठी काळ्या पैशाच्या वापराबाबत तक्रार करावी, असे आवाहन प्राप्तीकर विभाग, कोल्हापूरचे सहसंचालक (अन्वेषण) पुर्णेश गुरूरानी यांनी केले आहे.

पुर्णेश गुरूरानी म्हणाले, लोकसभा निवडणुकीदरम्यान काळा पैसा तसेच आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसावा यासाठी प्राप्तीकर विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. 44-सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीवर प्रभाव टाकू शकणारी रोकड, मौल्यवान वस्तु आणि इतर अवैध साधनांच्या हालचालीबाबत कडक नजर ठेवण्यात येत असून या संदर्भात गुप्त माहितीही गोळा केली जात आहे.

यासाठी शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली असून यासाठी सब नोडल अधिकारी म्हणून अमितकुमार खटावकर काम पाहणार आहेत. त्यांच्या टीममध्ये पडताळणी अधिकारी उत्कर्ष वेलणकर व शाम प्रसाद पवार यांचा समावेश आहे. या पथकाला मदत करण्यासाठी प्राप्तीकर निरीक्षक पुरेशा प्रमाणात देण्यात आले आहेत.

यावेळी पुर्णेश गुरूरानी म्हणाले, निवडणुकीसाठी काळ्या पैशाच्या वापराबाबत माहिती देण्यासाठी किंवा तक्रार नोंदविण्यासाठी पुणे येथे स्थापन केलेल्या व 24 तास सुरू राहणाऱ्या नियंत्रण कक्षाशी तसेच यासाठी 18002330700, 18002330701 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच 7498977898 या व्हॉटस् ऍ़प क्रमांकावर माहिती द्यावी. दक्ष नागरिकांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी आणि निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर होवू नये यासाठी काळा पैसा, सोने, चांदी यांची साठवणूक आणि वितरण याबाबतची माहिती संबधित दूरध्वनी क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *