Nandurbar: मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले आहेत.

ही सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. यात खाजगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स यांचा समावेश आहे. अपवादा‍त्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

Advertisements

लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या परिच्छेद 135 ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते अथवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. त्यामुळे मतदारांना कोणत्याही परिस्थितीत दोन ते तीन तासांची सवलत मतदानासाठी मिळेल याची आस्थापना मालकांनी दक्षता घ्यावी. मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधित आस्थापना मालक/व्यवस्थापनाविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *