मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक मगदूम) – जागतिक क्षय रोग दिनानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील सार्वजनिक रुग्णालय, सांगली. तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून दिनांक १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सलग १५ दिवस क्षयरोग पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

या कालावधीत रुग्णालयातर्फे रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मिनी म्यारेथोन, चित्रकला स्पर्धा, तज्ञ डॉक्टरांचे मार्ग दर्शन, पथनाट्य असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमामध्ये सांगली परिसरातील सर्व नर्सिंग कॉलेज, सामाजिक संस्था, मेडीकल कॉलेज,शासकीय निमशासकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, कॉलेजचे विद्यार्थी , मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयाचे सर्व विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी, सिव्हिल सर्जन, मेडीकल कॉलेजचे डीन, हॉस्पिटलचे मेडीकल सोशल वर्कर, या सर्वांचे सहकार्य लाभले, असे हॉस्पिटलच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रमती जोशी यांनी सांगितले.