मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने प्रचाराचा नारळ आज कोल्हापुरात फोडला. येत्या निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असा दावाही उपस्थित नेत्यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. श्री महालक्ष्मीचे दर्शन घेवून त्यांनी हा प्रचार शुभारंभ केला.

भाजप-सेना युती व्हावी ही जनतेची इच्छा होती. पण, युतीमुळे विरोधकांची स्थिती पंक्चर झालेल्या टायरी सारखी झाले आहे. काँग्रेस पक्ष शिल्लक राहील की नाही अशी स्थिती झाली आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. कोल्हापूर येथील लोकसभेचे युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी ठाकरे म्हणाले, आम्हाला सत्ता पाहिजे, ते गोरगरिबांच्या कल्याणासाठी पाहिजे. पण, विरोधकांना स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी पाहिजे आहे. त्यांनी हातात हात आणि पायात तंगडं घालण्याची वृत्ती आहे, यासाठी युतीला सत्ता द्या.