कोरडी रंगपंचमी साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” चा दिला संदेश
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – युवा पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कोरडी रंगपंचमी सोमवारी (दि. 25 /3 /2019) साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” चा संदेश दिला. याचे आयोजन युवा पत्रकार संघाचे (महाराष्ट्र राज्य) संथापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी केले होते.

यावेळी संथापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी, पाण्याची बचत करण्यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे. यावेळी कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने “पाणी वाचवा, देश वाचवा” हा संदेश दिला. तसेच पाणी हि राष्ट्रीय संपत्ती पाणी असून याचे आपणच जपणूक करावे, असे आवाहनही केले.

दरम्यान, सर्वांसाठी स्नेहभेजनाची व्यवस्था केली होती. यावेळी राज्य अध्यक्ष:- शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष:- रवीसागर हळवणकर, राज्य कार्याध्यक्ष:- रतन हुलस्वार, शहर अध्यक्ष:- असलम नदाफ, राज्य सदस्य:- फिरोज खाटीक, राज्य प्रसिद्धीप्रमुख:- जावेद देवडी, जिल्हा सचिव:- शरद माळी, करवीर तालुका उपाध्यक्ष:- मुबारक आत्तार, करवीर तालुका अध्यक्ष:- संतोष सावंत, कमलाकर सारंग, गौरव यादव, डी.एस. कोंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
