Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापुरातील राजारामपुरी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुण्यतिथी निमित्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अॅड. कवाळे म्हणाले कि, जग बदल घालुन घाव ,मज सांगुन गेले भिमराव. असा संदेश संपूर्ण मानव जातीला आण्णाभाऊंनी दिला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे जगतमान्य असून, परदेशातील अनेक भाषा मध्ये भाषांतरीत झाले आहे. असे मनोगत अॅड. दत्ताजी कवाळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही मागणी प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली.
यावेळी लहुजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अक्षय साळवे ,अॅड.धनंजय पठाडे, कार्याध्यक्ष अमोल कुरणे,
बाळासाहेब साळवी, गणेश पांढरबळे, प्रमोद दाभाडे, मुबारक आत्तार, रवी कोल्हटकर, बंडा अवघडे आदी उपस्थित होते.
Share Now