कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : शाहूपुरी पोलिसांनी रविवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री शाहूपुरी तिसऱ्या गल्ली मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला.
हुक्का पार्लर चालवणारे संशयित आरोपी ऋषिकेश प्रकाश पाटील (वय ३२, रा. शाहूपुरी तिसरी गल्ली ) श्रीधर वैजनाथ बेलेकर (वय २८ , रा. पोवाची वाडी , ता. चंदगड, जि. कोल्हापूर, सध्या राहणार शिक्षक कॉलनी पाचगाव ता. करवीर) या दोघांना अटक करण्यात आली तर हुक्का ओढणाऱ्या २९ तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून यातील बहुतांश तरुण हे गांधीनगरमधील तर काही तरुण कोल्हापूर शहरातील आहेत.
या पार्लरमधून काचेच्या भांड्यासह ८ पाईप तसेच हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे विविध फ्लेवरचे ६ डबे असा सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीमध्ये राहणारा ऋषिकेश पाटील हा आपल्या घरामध्ये हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी या ठिकाणी रात्री छापा टाकला हुक्का पार्लरचा मालक ऋषिकेश पाटील व हुक्का पार्लर चालवणारा श्रीधर बेलेकर या दोघांना अटक करण्यात आली.
या ठिकाणी हुक्का ओढणाऱ्या २९ तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून , यातील २५ तरुण हे गांधीनगर येथे राहणारे आहेत तर ४ तरुण हे कोल्हापूर शहरात राहणारे आहेत. पोलिसांनी या हुक्का पार्लर मधून काचेचे भांडे, ८ पाईप, हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारे विविध फ्लेवरचे ६ डबे असा सुमारे १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, पोलिसांनी अचानक छापा टाकल्यामुळे हुक्का ओढणार यांची धावपळ उडाली होती तसेच सर्वांना पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर त्यांचे नातेवाईक व मित्र मंडळींनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.
भर मध्यवर्ती परिसरामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या या हुक्का पार्लरवर कारवाई झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड व वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस हवालदार वसंत पिंगळे, युवराज पाटील, प्रथमेश पाटील, दिग्विजय चौगुले, जगदीश बामणीकर, विशाल चौगुले, दिगंबर पाटील, विजय इंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.