इचलकरंजी प्रतिनिधी महेश सोनवणे
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कोव्हीड रुग्णांवर तातडीने उपचार करुन मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आपले मुख्यालय स्थलांतरीत करावे,
असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
कोव्हिड-19 बाधित रुग्ण मृत्यूचे प्रमाण व वाढत चाललेला संसर्ग रोखण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय पत्राने निर्देश दिले होते. रुग्णालयातील खाट उपलब्धता, गंभीररित्या आजारी रुग्णांवर तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यां मार्फत करण्यात येत असलेल्या उपचारा बाबत हलगर्जी पणा होत नाही यांची दक्षता घेणे . मृत्यू झालेल्या रुग्णांची मृत्यू पडताळणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. इंदिरा गांधी सामन्य रुग्णालयातील कोव्हिड रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे व रुग्णालय व्यवस्थापन योग्यरित्या होत नाही.
याबाबत आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी तक्रारी केलेल्या आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपले मुख्यालय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथे पुढील आदेश होईपर्यंत स्थलांतरीत करावे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयात पूर्ण वेळ उपस्थित राहून रुग्णालयात दाखल रुग्णांच्या वैद्यकीय उपचारावर नियंत्रण ठेवावे व कोव्हिड रुग्णांचे मृत्यू होणार नाहीत व रुग्णांवर तातडीने योग्य उपचार होतील. याबाबत लक्ष ठेवावे.
आवश्यकता असल्यास गंभीर रुग्णांवर स्वत:च्या देखरेखीखाली उपचार करुन घ्यावेत. त्याच प्रमाणे या रुग्णांलयाचे सर्व साधारण व्यवस्थापण व जिल्ह्यातील त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालये विविध आदेशाने दिलेली कामे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथे तात्पुरते कार्यालय सुरु करुन पाहावे.
कोव्हिड-19 रुग्णांवर आपल्या अधिनस्त रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास वैद्यकीय उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्यास याबाबत आपणास जबाबदार धरण्यात येईल.
आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील असेही आदेशात नमुद आहे.