मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा निवडणूक शाखा यांचे संयुक्त विद्यमाने आज लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत ‘देश का महा त्योहार’ या मतदान जानजागृती संकल्पनेतून कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक महात्मा गांधी मैदान येथे भव्य रांगोळी साकारणेत आली. यामध्ये विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी निवडणूक निर्भयपणे पार पाडणेची शपथ घेतली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांचे संकल्पनेतून भव्य मानवी रांगोळीचे आयोजन करणेत आले होते. याकरिता कोल्हापूर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सुमारे 6500 विद्यार्थ्यांच्या सहभागाने ही संकल्पना साकारणेत आली. विद्यार्थ्यांचा सहभाग व प्रचंड उत्साह यामूळे हा कार्यक्रम उत्स्फुर्तपणे पार पाडला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी बोलताना देशात प्रथमच असा प्रयोग होत असलेचे नमूद करुन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बोलताना देशाची भावी पीढी अशा उपक्रमामध्ये सहभागी होत असलेने देश पातळीवर याचा सकारात्मक संदेश पोहचविण्यासाठी निश्चित पणे उपयोग होईल असे गौरव उद्गार काढले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केले. उपआयुक्त मंगेश शिंदे व प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम पार पडला.

या कार्यक्रमानिमित्त उभा केलेल्या सेल्फी पाँईटवर मान्यवरांनी आपले फोटो काढले. तसेच या निमित्ताने ठेवणेत आलेल्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त्त, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त आयुक्त यांचेहस अन्य अधिकारी यांनी स्वाक्षरी केली.
देश का महा त्योहारʈ या संपूर्ण उपक्रमासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती यांनी विशेष परिश्रम घेवून सदरचा उपक्रम यशस्वी होणेसाठी क्रीडा निरिक्षक सचिन पांडव, नागेश हंकारे, राजेंद्र बनसोडे, विʉाास माळी, संजय वाडकर, किशोर पाटील, मुल्ला दस्तगीर, प्रशांत जाधव, शितल होगाडे, रमण लोहार, विʉाास शिंदे, इंद्रजित बंदसोडे, शैलेश कांबळे, रितेश माने, दिगंबर गवळी, मानसिंग पाटील, अजय पाटील, गौरव पोवार, अजय कदम, रोहित पाटील हर्षद कांबळे, विजय सुतार, प्रविण भालेकर, किरण पाडळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमामध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, म.ल.ग.हायस्कूल, प्रि. इंदूमतीदेवी गर्ल्स हायस्कूल, म.न.पा. पी.बी.साळुंखे विद्यामंदिर, स.म.लोहिया हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश स्कूल, न्यु हायस्कूल, श्री. व.ज.देशमुख हायस्कूल, व.ज.देशमुख प्रायमरी इंग्लिश स्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यानिकेतन, कोल्हापूर हायस्कूल, नुतन आदर्श विद्यालय, म.न.पा.नेहरुनगर विद्यामंदिर, म.न.पा. वीर कक्कय विद्यामंदिर, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्यामंदिर, म.न.पा. राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलकडील विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होते. तसेच या कार्यक्रमात अंध विद्यार्थी, विद्यार्थ्यींनी सहभागी झाल्या होत्या.
या कार्याक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतिश धुमाळ, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल ऑफिसर प्रियदर्शनी मोरे, नायब तहसिलदार प्रकाश दगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल ऑफिसर रविकांत अडसुळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखा परिक्षक धनंजय अंाधळे, सहा. आयुक्त संजय सरनाईक, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.माने, आर.के.जाधव, हर्षजित घाटगे, लेखापाल बाबा साळोखे, कार्यक्रम अधिकारी रसुल पाटील यांचेसह महानगरपालिका व प्राथमिक शिक्षण समितीकडील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन आर. जी. कांबळे, विजय वणकुद्रे, संदिप मगदूम यांनी केले.