Sangli : मतदानादिवशीचे आठवडी बाजार पुढे ढकलले

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे मतदान मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होत आहे. मतदानादिवशी जिल्ह्यातील ज्या विविध गावांमध्ये व शहरामध्ये आठवडा बाजार आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मतदान सुस्थितीत, शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मतदानादिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलण्याचा आदेश जारी केला आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *