Sangli : जिल्ह्यात आजपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक-2019 ची आचारसंहिता सुरू झालेली आहे. तसेच, जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक अत्यंत चुरशीने होतील. या चुरशीतून प्रसंगी राजकीय संघर्ष होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, शांतता रहावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दिनांक 10 ते 25 एप्रिल 2019 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे.

Advertisements

मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 10 एप्रिल 2019 रोजीच्या 06.00 वाजल्यापाूसन लागू झाला असून तो दिनांक 25 एप्रिल 2019 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *