Kolhapur: शिरोली नाका येथे पोलिसांनी पकडली रोकड; एकजण ताब्यात

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/जावेद देवडी) – शिरोली नाका येथे पोलिसांनी आज (दि. ८ एप्रिल २०१९, सोमवारी) दुपारी मारुती ओम्नीमधून (एमएच ०६ एएफ २३६१) सुमारे ६२,६८,०४४ रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम शशिकांत भीमा चिगरी (वय २८ वर्षे, रा.पाचगांव, ता.करवीर) याच्याकडे मिळून आली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

या रक्कमेबाबत चिगरी याच्याकडे पोलीसांनी चौकशी करुन त्याला वैध कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने असमर्थता दर्शविली. त्याच्यावर कलम १०२ सीआरपीसीप्रमाणे पंचनामा करून पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *