Share Now
Read Time:1 Minute, 0 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/शरद माळी) – महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, परवाना अधिक्षक रामचंद्र काटकर, अस्थापना अधिक्षक सागर कांबळे, विजय वनकुद्रे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र वेल्हाळ व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share Now