Pune : लाचखोर पोलीस नाईक विनायक मोहिते एसीबीच्या जाळ्यात

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान तक्रादाराकडे सुमारे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनायक नानासाहेब मोहिते (वय ४५, ब.नं. ५३४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे केली. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार याच्या भावावर गुन्हा दाखल आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची पडताळणी ११ एप्रिल २०१९ रोजी केली असता यात जमीनसाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाईत मदत करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनायक नानासाहेब मोहिते याने तक्रारदार यांच्याकडे सुमारे पाच हजार रुपयांची लाच मागितली.

Advertisements

याप्रकरणी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे पोलीस नाईक विनायक मोहिते यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

ही कारवाई पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त तथा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली. तसेच यावेळी शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *