Pune : दाऊद इब्राहीम टोळीतील सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील सराईत गुन्हेगार संतोष गोपाळ नायर (वय 45) याला विश्रांतवाडी पोलीसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. मागील सहा वर्षांपासून तो ओळख लपवून तो विमानतळ परिसरात खानावळ चालवत होता. पुणे पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, 2004 मध्ये दाखल असलेल्या एका दरोड्याचा गुन्ह्यात तो फरार होता. मुंबईतील दहिसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशाप्रकारचे 40 पेक्ष्या अधिक गुन्हे दाखल आहेत. 2004 मध्ये त्याने मुंबईत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून तो फरार होता.

Advertisements

मागील सहा वर्षांपासून तो पुण्यात येऊन राहत होता. विमाननगर परिसरात त्याने खानावळ सुरू केली होती. ओळख लपविण्यासाठी तो जास्त बाहेर पडत नव्हता..तसेच लोकांमध्ये मिसळतही नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *