प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
गडमुडशिंगी ता.करवीर येथिल संजयगांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष कांबळे यांच्या कुटुबांमध्ये गोंडस बाळाचा जन्म झाला.
बाळाचा जन्म झाल्यानंतर तीन दिवसानी लहान बाळास १ वर्षापूर्वी कावीळ झाली होती.
उपचार सुरू होते पण प्रतिसाद मिळत नव्हता.कावीळ पूर्ण रक्तात पसरलेने रक्त बदलणे हा एकच पर्याय डॉक्टरांनी सांगितला. ओ निगेटीव्ह रक्ताची शोधाशोध सुरू झाली कुटूंब चिंताग्रस्त होते.
त्याचवेळी डॉक्टरांनीहि संपर्क सुरू ठेवले व डॉ.मंगेश ठमके( एम डी आयुर्वेद) यांना डॉक्टरांनी संपर्क करून ओ निगेटिव्ह रक्ताची गरज सांगताच डॉ.ठमके हे तात्काळ सिपीआर येथे येवून रक्तदान केले व बाळाचे आयुष्य सुखकर झाले.व बाळाला पुर्नजन्म मिळाला.
जन्मताच बाळाने संघर्ष केला म्हणून त्याचे नांव आम्ही संघर्ष ठेवले.
याचा पहिला वाढदिवस.19/11/2020 साजरा करित असताना डॉ.ठमके सरांची प्रकर्षाने आठवन झाली.म्हणून त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करणेसाठी त्यांच्या आयुर्वेद पंचकर्म सेंटर शाहूपूरी कोल्हापूर येथे जावून त्यांचा सत्कार करून बाळाचा वाढदिवस साजरा करणेत आला.
यावेळी तेथिल डॉ.शशिकांत कुंभार सर सर्व स्टाफ व पेशंट यांचे सोबत त्यांचा सत्कार करताना करवीरचे माजी उपसभापती नंदकूमार गोंधळी,राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हपूर दक्षिण अध्यक्ष आप्पासाहेब धनवडे,सामाजिक कार्यकर्ते रतन कांबळे,संतोष कांबळे यांचे उपस्थितीत करणेत आला.
यावेळी डॉ.ठमके हे भारावून गेले.त्यांनीहि जो सत्कार केला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले व रक्तदान किती आवश्यक आहे हे सांगितले आणि रक्तदान हि चळवळ उभी करूया असे सांगितले अश्या अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला याबद्दल कांबळे कुटुंबांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे….