नवी मुंबईकरांच्या सेवेत दोन ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस’

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 24 Second

स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला सामोरे जाताना ‘निश्चय केला – नंबर पहिला’ असा निर्धार व्यक्त करीतमहापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छताविषयकअभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. कचरामुक्त शहरांचे फाईव्ह स्टार मानांकनप्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असून हागणदारीमुक्त शहराचेडबल प्लस रेटींग नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहे.

त्या अनुषंगाने स्वच्छतेचाच महत्वाचा भागअसलेल्या शौचालयांकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. शौचालयांविषयी अभिनव संकल्पनाराबवित ‘थ्री आर’ मधील ‘रियूज’ अर्थात ‘टाकाऊतून टिकाऊ’ म्हणजे पुनर्वापराचीसंकल्पना यशस्वीपणे राबवित एन.एम.एम.टी. च्या दोन वापरात नसलेल्या बसेसचे कलात्मकरूपांतरण करून त्याचा वापर मोबाईल टॉयलेटमध्ये करण्यात आलेला आहे. अशा दोन ‘अपसायकल आर्ट टॉयलेट बसेस’ आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत.

या वापरातनसलेल्या दोन एन.एम.एम.टी. बसेसचे रूपांतरण करून तयार करण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेटचेलोकार्पण अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्याप्रांगणात करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहोबचाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, समाजविकासविभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील, उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.प्रल्हाद खोसे, उपअभियंता श्री. वसंत पडघन, कल्याणी क्लिनटेकचे व्यवस्थापक सौरभ कनाडे, लेखापाल मीनल डोंगरे, ग्लोबलग्रीन इनोव्हेटर्सचे जसपाल सिंग नेओल.बिनॉय के, निखील एम. आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या दोन्ही वापरातनसलेल्या बसेसचे मे. कल्याणी क्लिनटेकप्रा.लि. हे मे. सारा प्लास्ट प्रा.लि. ची सहयोगी कंपनी यांनी मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरणकेले असून ग्लोबलग्रीन इनोव्हेटर्स प्रा. ली. यांनी अत्यंत आकर्षक रितीने ‘अप सायकल आर्टटॉयलेट बस’ कलात्मक स्वरूपात साकारली आहे. या कलात्मकतेमध्ये जसपाल सिंग नेओल .बिनॉय के, निखील एम. आणि आर्टिस्ट संकल्प पाटील, सुधीर शेडगे व वैभव घाग यांचामहत्वाचा वाटा आहे.

यादोन्ही विनावापर बसेसचे मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण करण्यात आले असून प्रत्येकबसच्या  पुढील भागात महिलांकरिता व मागीलभागात पुरूषांकरीता स्वच्छतागृह व्यवस्था आहे. पुरूष व महिलांसाठी प्रवेशाकरितादोन्ही बाजूस स्वतंत्र दरवाजे आहेत. आतील भागात महिलांसाठी तीन शौचकूपांची तसेचपुरूषांसाठी 2 शौचकुपांची व्यवस्था आहे व पुरूषांच्या भागात 2 मुतारी व्यवस्थाठेवण्यात आलेली आहे. याशिवाय 2 वॉश बेसीन असून यामध्ये स्वतंत्र स्टोर रूम  देखील आहेत. या बसेसच्या टपावर पाण्याची टाकी बसविण्यातआलेली असून सर्व गोष्टींचा विचार करून ही मोबाईल टॉयलेट नवी मुंबईकरांच्यासेवेसाठी सज्ज झालेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *