Kolhapur : महापालिकेच्या वतीने अग्निशमन सेवा दिन साजरा

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 48 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – सन 14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जाहजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 66 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्ल अग्निशमन सेवा दिन व सप्ताह साजरा करण्यात येतो.

महापालिकेच्यावतीने आज अग्निशमन सेवा दिनानिमित्त ताराराणी फायर स्टेशन येथे अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. या कार्यक्रमात फायर गीत, श्रध्दाजंली वाहण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, स्टेशन ऑफिसर तानाजी कवाळे, दस्तगीर मुल्ला, जयवंत खोत, ओंकार खेडकर, अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

दि.29/11/18 रोजी करणेरीवाडी येथील क्लोरीण गळती व टोप संभापूर येथे बायोगॅस गळती झाली होती त्यावेळी मंदार कांदळकर, सुनिल यादव, अजित मळेकर यांनी धाडसाने सदर गळती बंद करुन पुढील अनर्थ टाळला याबद्दल त्यांचा आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सन 2018-19 करीता उत्कृष्ट कामगिरी करणारे तांडेल रवि ठोंबरे, खानू शिणगारे व उत्कृष्ट वाहनचालक सुनिल वांईगडे, संदीप व्हनाळकर, नवनाथ साबळे यांचा आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच अग्निशन दिनानिमित्त फायरमन यांच्यासाठी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सिंगल प्लेअरमध्ये प्रथम क्रमांक संदीप पाटील, द्वितीय क्रमांक सुशांत जोंधळे, डबल प्लेअरमध्ये प्रथम क्रमांक संदीप पाटील, सुशांत जोंधळे, द्वितीय क्रमांक ओंकार खेडकर, प्रकाश ठोंबर यांनी पटकाविला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवृत्ती पाटील यांनी काम पाहिले. या सर्वांचा सत्कार आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.

सहाय्यक फौजदार विलास टिपुगडे यांनी बिगुलवादन केलेने त्यांचा आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ते दरवर्षी अग्निशम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बिगुलवादन करतात.

यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताराराणी फायर स्टेशन -कावळानाका-व्हिनस कॉर्नर- लक्ष्मीपूरी-बिंदू चौक-मिरजकर तिकटी-महाद्वाररोड-पापाची तिकटी-महापालिका मुख्य कार्यालयापर्यन्त अग्निशमन गाडी व दुचाकीवरुन रॅली काढण्यात आली. महापालिका अग्निशमन दलाच्यावतीने दिनांक 14 एप्रिल 2019 ते दि. 20 एप्रिल 2019 या कालावधीत अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये शाळा, कॉलेज व सार्वजानिक ठिकाणी आग्निशमन दलाची सुरक्षेच्या दृष्टीने प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *