कोल्हापूर शहरातील सर्व प्रॉपर्टी कार्ड आता मिळणार ऑनलाईन

▪️कोल्हापूर (समीर काझी)

भूमी अभिलेख विभागाच्यावतीने कोल्हापूर शहरातील ४३ हजार २४ प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) आता ऑनलाईन करण्यात आले आहेत, यामुळे कोल्हापूर शहरवासीयांना आता डिजिटल स्वाक्षरीचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डबरोबरच लवकरच ई-फेरफारचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर शहरात एकूण ४६ हजार १८५ प्रॉपर्टी कार्ड आहेत, यांपैकी ४३ हजार २४ कार्ड ऑनलाईन करण्यात आले आहेत, तर २ हजार ७०४ कार्ड ऑनलाइन करण्याचे काम अद्याप सुरू आहे.
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन करण्याचे काम सुरू होते. प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन करून त्यावर डिजिटल स्वाक्षरीचेही काम पूर्ण झाले आहे.

Advertisements

यामुळे शहरातील प्रॉपर्टी कार्ड भूमिअभिलेख विभागाच्या “महा ई-भूमी” या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत, तसेच त्यांची प्रतही काढता येणार आहे. प्रत काढण्याकरिता आवश्यक ते निर्धारित केलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे, हे शुल्क जमा झाल्यानंतर हव्या त्या सिटी सर्व्हे नंबर चे प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणारे आणि डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय कार्यालयांत ग्राह्य धरले जाणार आहे.
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन झाल्याने आता कोल्हापूर शहरवासीयांना नगरभूमापन कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही, याचे सर्व नागरिकांच्यावतीने स्वागत करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *