विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकास काळाची गरज : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कोणतीही पदवी संपादन करत असताना किमान एखादे
तरी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असून केवळ शिक्षण घेऊन विध्यार्थी गतिमान होणार
नाही यासाठी कौशल्य शिक्षण गरजेचे असून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य
विकास होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के
यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन
प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पी . एस . पाटील, विज्ञान विद्याशाखेचे
अधिष्ठाता प्रा. डॉ. आर . के . कामत , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. डॉ. एम
.एम . देशमुख, विध्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. आर. व्ही . गुरव , एनएसएस चे संचालक
डॉ. अजय जायभाये, प्लेसमेंट विभागाचे डॉ. गजानन राशिनकर, डॉ. घुले, विद्यापीठ
परिक्षेत्रातील उद्योजक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
या वेळी बोलताना कुलगुरू डॉ शिर्के म्हणाले की, कौशल्य विकासासाठी मर्यादा नसून अनेक
कौशल्ये व्यक्तीला आत्मसात करता येतात. आज विविध कौशल्य असणाऱ्या व्यक्तीला
रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून या संधी विद्यापीठाने या केंद्राच्या माध्यमातून
उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्र चांगल्या प्रकारे कार्यरत असून आज या केंद्राच्या नवीन
इमारतीमधून या कार्याला अधिक गती मिळेल यात शंका नाही. या केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ.
ए . एम . गुरव व त्यांचे सहकारी चांगल्या प्रकारे काम करत असून कौशल्य व उद्योजकता
विकासासाठी विद्यापीठ नेहमी अग्रेसर राहील.प्रास्ताविक व स्वागत केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ए . एम . गुरव यांनी केले.
यावेळी महेश चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *