Share Now
म. खुदबुद्दीनसो बेपारी यांच्या स्मरणार्थ मुस्लिम बेपारी जमात व खुदबुद्दीन बेपारी सामाजिक फांउडेशन, कोल्हापूर (K.B Group) सदर बाजार हौसिंग सोसायटी सांस्कृतिक हॉल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय ब्लड बँक (CPR blood bank) यांचे सहकार्य मिळाले यावेळी ६७ लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे पुर्नगठन करुन कार्यकारी अध्यक्ष पदासह राजेश क्षीरसागर यांना (कॅबिनेट मंत्री दर्जा) हे पद मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवा नेते तन्वीर खुदबुद्दीनसो बेपारी, माजी नगरसेवक अशोकराव भंडारे, सामाजिक कार्यकर्ते मारुती माने, हाजी सिराज चौधरी, विजय तेरदाळकर, मेहबूब बेपारी, कादर बेपारी, सदर बाजार हौसिंग सोसायटीचे चेअरमन सुदाम हुलस्वIर, जमातीचे व फांउडेशनचे सर्व पदाधिकारी, सभासद व
हितचिंतक उपस्थित होते.
Share Now