शाहू स्मारक येथे रेशन वरती सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्हावा तसेच रेशन वर गहू तांदूळ व्यतिरिक्त साखर डाळ तेल अनुदान देऊन सरकारने उपलब्ध करावे असे आवाहन काॅ चंद्रकांत यादव यांनी केले.
अध्यक्षस्थानी रवींद्र मोरे जिल्हा अध्यक्ष होते .शोध पत्रिका मोहीमेच्या निमीत्ताने जाचक अटी लादून एक लाख उत्पन्न मर्यादा गॅस असल्यास रेशन बंद एकाच रहिवासी पत्त्यावर विभक्त कार्ड असल्यास ते रद्द या जाचक अटी मुळे रेशन बंद होईल म्हणून या विरूध्द जनतेला बरोबर घेऊन आंदोलना शिवाय पर्याय नाही जनतेने या आंदोलनात प्रचंड संख्येने भागीदारी करावी असे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक राजेश मंडलिक शहर अध्यक्ष यांनी केले
तसेच दीपक शिराळे अण्णा राज्य सदस्य अशोक सोलापुरे खजिनदार अरूण शिंदे राज्य सदस्य गजानन हवालदार शहर उपाध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले. मेळाव्यास सचिन चव्हाण, अनिल जंगटे, साताप्पा कांबळे, निखिल तोरस्कर, प्रमोद हराळे, सुनिल दावणे, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.