कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही बेळगावच्या गोमटेश विद्यापीठाचे संचालक आणि गोमटेश विद्यापीठ संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल ,निपाणी चे व्हाइस चेअरमन प्रशांत पाटील यांनी येथे बोलताना दिली . प्रशांत पाटील यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्यकरिणीवर निवड झाल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते त्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला . युवा पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,ज्येष्ठ पत्रकार- लेखक नवाब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना शिवाजी शिंगे यांनी प्रशांत पाटील यांच्यासारखे शिक्षण क्षेत्रातील दिगंग्ज कोल्हापूरचे नाव कर्नाटक राज्यातदेखील झळकवत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे नमूद केले .अशी व्यक्ती युवा पत्रकार संघ परिवाराचा सक्रिय घटक म्हणून पुढे येणे ही बाब युवा पत्रकार संघासाठी गौरवास्पद असल्याचे उदगार त्यांनी काढले. लवकरच युवा पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना युवा पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा शिंगे यांनी यावेळी बोलताना केली . या वेळी नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देऊन संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते प्रशांत पाटील यांचा गौरव करण्यात आला .