Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 20 Second
“जमियत उलेमा-ए-शहर, कोल्हापूर” तर्फे नशा मुक्तीसाठी जनजागृती मोहीम संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, त्या अंतर्गत मलकापूर येथे ही मोहीम पार पडली.
यावेळी बोलताना “जमीयत उलेमा-ए-शहर कोल्हापूर” चे सदर मौलाना अजहर सय्यद म्हणाले, “कोणत्याही प्रकारचा नशा हा इस्लाम धर्मात पूर्णपणे हराम आहे, तसेच सर्वच धर्मांत निषिध्द आहे. नशा केल्यामुळे अनेक प्राणघातक व दुर्धर आजार होऊ शकतात, यामध्ये कर्क रोगासारखे मोठे आजार होऊ शकतात. व्यक्ती सर्व प्रकारच्या नशा व वाईट व्यसनांपासून दूर राहिल्यास त्याचे व इतरांचे जीवन सुकर होईल.
याप्रसंगी “जमियत उलेमा-ए-कोल्हापूर शहर” चे पदाधिकारी हाफिज समीर उस्ताद, हाफिज जावेद, हाफिज इमरान, गुलाबभाई मुजावर, अनेक कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते.