श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांचे तर्फे रविवार दि. ७ मार्च २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजलेल्या या शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेली १० वर्षे हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे सुरू असून या वर्षी या शिबिरात उच्चांकी ३२४ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ४२ महिला रक्तदात्यांचा लक्षणीय सहभाग होता. संस्थेचे अध्यक्ष श्री राजू मेवेकरी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध व नीटनेटक्या नियोजनात हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राजू मेवेकरी यांना राजू सुगंधी, संजय जोशी, विराज कुलकर्णी, तन्मय मेवेकरी, गिरीश कुलकर्णी, आदित्य मेवेकरी, सुनील खडके, प्रशांत तहसिलदार, एस. के कुलकर्णी, रजत जोशी, प्रतिक गुरव, अमित मेवेकरी, अतिश मेवेकरी, यांच्यासह समस्त कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजलेल्या या शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Read Time:1 Minute, 42 Second