समाजमनावर कमी कालावधीत मोठा परिणाम करण्याचे समार्थ्य शॉर्ट फिल्ममध्ये आहे. लघुपटाची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी आहे. त्यामुळेच या नव्या संधीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहा. यातील तंत्र समजावून घ्या. असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. चित्रतपस्वी भालजी पेंढाकर शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये आज ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे हा फेस्टिव्हल झाला.
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटी तर्फे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी 42 शॉर्ट फिल्म आल्या होत्या. त्यातील 27 प्रदर्शीत करण्यात आल्या होत्या. मराठी, तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतील हे शॉर्ट फिल्म होत्या. संध्याकाळी महोत्सवाचे पुरस्कारवीतरण झाले. यावेळी परीक्षाक विद्यासागर अध्यापक आणि महेश डिग्रजकर यांनी शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. गोकूळचे अध्यक्ष रविंद्र आपटे, संचालक बाबा देसाई, राहूल सोलापुरकर यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी राहुल सोलापूरकर यांची मुलाखत भरत दैनी यांनी घेतली. यावेळी सोलापूरकर म्हणाले,”भालजी पेंढारकरांनी इतिहास न बदलता शिवचरित्र बोलपटातून मांडले. त्यांचे चित्रपट आजही सर्वांना अभ्यासण्यासारखे आहेत. कमीत कमी वेळात समाजमनावर मोठा प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य शॉर्ट फिल्ममध्ये आहे. त्यामुळेच परदेशामध्ये शॉर्ट फिल्मला फार महत्त्व आहे. शॉर्ट फिल्मची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी आहे. जगभरात शॉर्ट फिल्मचे दहा ते पंधरा हजार फेस्टिव्हल होतात. चांगली शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी आधी जगाचा सिनेमा पहायला शिकले पाहीजे. यातील तंत्र समजावून घेतले पाहीजे. वेगळा विचार करा. तुम्हाला जे मांडायचे आहे ते मनापासून मांडा तरच ते प्रेक्षकाच्या मनात उतरेल.’
————————————————————————-
पुरस्कार विजेते
1) सर्वोत्कृष्ठ शॉर्ट फिल्म चित्रतपस्वी पुरस्कार – संगर
2) सर्वोत्कृष्ठ शॉर्ट फिल्म चित्रदर्शी पुरस्कार – पाऊस
3) सर्वोत्कृष्ठ शॉर्ट फिल्म कलासक्त पुरस्कार – नकार
4) सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक – उमेश बोळके (संगर)
5) सर्वोत्कृष्ठ अभिनेता – सुनिल चौगुले (संगर)
6) सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री – मंजुषा खेत्री (काजवा)
7) सर्वोत्कृष्ठ पटकथा – विजय माळी (भाकड)
8) सर्वोत्कृष्ठ छायाचित्रण – अमोल घाडीगावकर ÷(फ्रॉन्स)
9) सर्वोत्कृष्ठ पार्श्वसंगीत – केदार कुलकर्णी (चंद्रलेखा)
10 सर्वोत्कृष्ठ संकलन – पुष्कर जळगावकर (प्रॉन्स)
शॉर्ट फिल्मची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे प्रतिपादन.

Read Time:3 Minute, 57 Second