Share Now
Read Time:1 Minute, 14 Second
कोल्हापूर: जावेद देवडी
गोकुळ निवडणुकीच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे . पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कुरघोडी करत सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीने इचलकरकरंजी चे आमदार प्रकाश आवाडे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना आपल्या तंबूत दाखल करून घेण्यात बाजी मारली आहे .आज हॉटेल पंचशील येथे झालेल्या पत्रकार बैठकीत सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार पी एन पाटील ,माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत राजू शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला .आमदार प्रकाश आवाडे मुंबईत असल्याने ते उद्या स्वतंत्र रित्या आपला पाठिंबा जाहिर करतील अशी माहिती आमदार पी एन पाटील यांनी यावेळी दिली .
Share Now