Share Now
Read Time:1 Minute, 11 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
राज्यात गुरुवारी नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्ण कोरोनामुक्त!
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात गुरुवारी तब्बल 66 हजार 159 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दिलासायदायक म्हणजे काल नवीन 68 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3799266 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 670301 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे.
Share Now