माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा

राधानगरी प्रतिनिधी:अतुल पाटील

माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा
शेतकरी विलास पाटील यांचा इशारा.

Advertisements

 

 

राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या सामाईक शेतीमधील अवैध उत्खनन करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याची घटना घडलीय,

संबंधित शेतकरी विलास शाहू पाटील यांनी या घटनेची सखोल चौकशी करून पाठीशी घालणारे अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि राधानगरी पोलीस ठाण्यास पाठवल्या आहेत.

 

 

माजगाव इथं गट नं.३९२ मध्ये विलास शाहू पाटील, शंकर शंभू पाटील, संजय आण्णा पाटील आणि अशोक केशव पाटील यांची सामाईक हिस्सेदार ८१ गुंठे जमीन आहे. यामध्ये फक्त अशोक केशव पाटील यांच्याच संमतीने ८१ गुंठे क्षेत्रात त्रिवेणी कन्स्ट्रक्शन बोरवडे यांनी माजगाव रस्त्यासाठी दररोज ५०० ट्राँली असे दहा दिवस पाच हजार ट्राँली मुरुमाचे उत्खनन केले आहे.

 

 

याबाबतची लेखी तक्रार विलास पाटील यांनी राधानगरी तहसीलदार यांना दिली होती. या तक्रारीवरून कसबा वाळवे मंडल अधिकारी विशांत भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली मात्र ,पाच हजार ट्राँली पेक्षा अधिक उत्खनन होऊनही संबंधितांकडून लाच घेऊन कमी उत्खनन दाखवून शासनाची फसवणूक केली आहे तसेच आपल्या शेतीचे नुकसान झाल्याचे निवेदनाद्वारे म्हंटले आहे.

या अवैध उत्खननाची सखोल चौकशी करून उत्खनन थांबवावे आणि संबंधित लोक आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आपल्याला न्याय मिळावा अन्यथा पुढील आठवड्यात तहसीलदार कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा विलास शाहू पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *