विशेष वृत्त जावेद देवडी
कोल्हापूर:-संयुक्त आझाद गल्ली, हुजूर गल्ली, आराम कॉर्नर,राजाराम रोड ,छत्रपती शिवाजी रोड व शिवांजनी फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्र.३२ भागातील सर्व नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत निवेदन म.न.पा.सह.आयुक्त श्री.संदीप घार्ग यांना देताना शिवांजनी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पवार
भागातील नागरिकांना सी.पी.आर किंवा सावित्रीबाई फुले हाँस्पीटल येथील केंद्रावर १८ वर्षावरील व्यक्तींना लसीकरण सुरु केले नंतर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
अशावेळी गुजरी कॉर्नर येथे असणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू होमिओपॅथी या आपल्या महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू करावे.
जेणे करून भागातील नागरिकांना सोय होईल.
याबाबतचे निवेदन फाउंडेशन अध्यक्ष अजित पवार यांनी निवेदनाद्वारे कोमनपा सह आयुक्त यांच्याकडे केली.
तसेच दवाखाना लागणारे साहित्य, लसीकरणसाठी शीत कपाट, मंडप, पिण्याच्या पाणी, स्वयसेवक,सँनीटायझर इ.सोय शिवांजनी फौउडेशन करणार आहे.
असे आव्हान करण्यात आले
आरोग्य विभाग सह.आयुक्त संदीप घार्ग म्हणाले. अशा उपक्रमांसाठी सोयी संस्थांनी पुढे यावे.
आपल्या या मागणीची स्वागत असुन
पुर्तता लवकरच करण्यात येईल.