शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा

विशेष वृत्त : जावेद देवडी

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा

Advertisements

महाराष्ट्र पोलीस दलातील कर्त्यव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरिक्षक व सध्या कोल्हापूरातील शाहुपुरी पोलीस निरीक्षक तसेच शासनाच्या आणि समाजातील अनेक पुरस्काराचे सन्मानित. मा.श्री.श्रीकृष्ण लक्ष्मण कटकधोंड यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांचे  १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले आहे.

माणूस नेहमीच पदाने नाही तर कार्यकर्तृत्वाने मोठा होतो याचीच प्रचिती म्हणजे
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी, शाहूपुरी चे पी.आय.
सन २०१९च्या ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने महापूर येऊन सर्वत्र हाहाकार माजला होता. त्यावेळेस पोलीस निरीक्षक कटकधोंड शिरोळ तालुक्यातील शिरोळ पोलीस ठाण्याचे प्रमुख होते.

त्यावेळी आपल्या स्वःताच्या जीवाची पर्वा न करता जुजबी जीवरक्षक सामुग्रीच्या साहय्याने शेकडो पुरग्रस्त नांगरिकांचे प्राण वाचवण्याचे साहसीकार्य केल्याचे फलीत म्हणून श्री कटकधोंड यांना आजचा हा “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ” प्राप्त झाला आहे.

पोलीस दलातील सेवेचा आवाकाच इतका प्रचंड की जून २०१८ मध्ये शिरोळ पोलीस ठाण्यात रूजू झाल्याबरोबर गुन्हेगारांवर जरब बसवत त्यांचे कर्दनकाळ ठरले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच महापुराने त्यांच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रांत हाहाकार माजवून अनेकांचे प्राण कंठाशी आणले.

पण कटकधोंड यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने महापुराशी दोन हात करून अनेकांना जीवदान दिले. शिरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ पोलीस ठाणे व सध्या कार्यरत असलेले शाहुपुरी पोलीस ठाणे अंतर्गत रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालयासह डझनभर शासकीय कार्यालये, अनेक न्यायालयाचे एकत्रीत असलेले न्यायसंकुल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, अनेक सरकारी व सहकारी बँका आणि त्याच्या जोडीला कोल्हापूर शहरापैकी जवळपास ४०% अनेक मोठ्या प्रमाणात व्यवसाय असलेला परिसर. त्यात उत्तुंग इमारती मधील उच्चभ्रु वस्ती आणि मध्यमवर्गिया बरोबरचं झोपडपट्टीचा सुध्दा समावेश असलेली नागरीवस्ती असा प्रचंड कामाचा व्याप असलेली शाहूपुरी पोलिस ठाणे,
कर्त्यव्यनिष्ठ पोलीस अधिकारी श्री.श्रीकृष्ण कटकधोंड यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *