युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगली जिल्हा संघटक राजेंद्र पाटील यांच्या बडीलांचे स्वर्गीय यल्लाप्पा कुशप्पा पाटील वयाच्या ५८ व्या वर्षी दिनांक १०/९/२०२१ रोजी दुःखद निधन झाले. युवा पत्रकार संघाच्या वतीने राजेंद्र पाटील यांच्या वडिलांचे निधन झालेने आज शोक सभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली .
राजेंद्र बाबा विषय थोडस..
राजू म्हणतात आज मात्र माझी स्वतःचीच सावली हरवून बसल्याने कमालीची बेचैनी आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सहवास-संपर्कात जे जे आले, माझे बाबा त्यांचे आदराने बाबा कधी झाली,हे त्यांनाही कळले नसेल…प्रेमळ, जिद्दी,हळवी,कष्टाळू , धाडसी, संकटांना नजुमानणारी,बेस्ट डिसिजन मेकर आणि जिव्हाळ्यानं माणसं जोडून ठेवणारा बाबा आपल्या लेकरांसंदर्भात सोशिकता आणि त्याग ही आद्यकर्तव्य देवूनच परमेश्वराने बाबा हे पात्र बनविले असावे! त्यामुळेच तर बाबा महालातला असो वा झोपडीतला,बाबा अमेरिकेतील असो वा भारतातील, अर्थात जगाच्या पाठीवरील
बाबा कुठलाही असो तो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराने दिलेल्या त्या आद्यकर्तव्याचे पालन करतेच.आपल्या लेकरांसाठी स्वतः चा जीव झिजवतेच! बाबांनी आयुष्यभर ते तर केलेच पण ते करताना माणसं जोडुन घ्यायचं चांगुलपण, माणुसकी, आत्मसन्मान आणि मोठं काम उभं करण्यासाठी सतत धडपडण्याची जिद्द आमच्यात ठासून रुजविली.पोटात अन्नाचा कण नसला तरी कल्पनादारिद्र्य कधी आसपासही फिरकू दिलं नाही! बाबांना आमच्या कडून जे अपेक्षित होतं, आजवरच्या जीवनात त्यातलं आम्ही थोड बहुत केल होत अजुन काही बाकी आहे पाणावलेल्या डोळ्यांनी राजेंद्र म्हणाले बाबा नसल्याच्या वास्तवाने मानगुटीवर बसलेली बेचैनी व अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही.. बाबांनी जे दिलं त्याचं सोनं करीत राहणं, एवढंच आपल्या हाती आहे.
ते करण्याचं बळ आम्हाला सदैव मिळत राहो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
शोक सभेला पश्चिम महाराष्ट्र संघटक पत्रकार हसरत इनामदार, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कुरणे, प्रदेश सचिव शरद गाडे,नुतन सांगली जिल्हा अध्यक्ष विकास मगदुम, व पत्रकार उपस्थित होते.
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी सभासद राजू पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो…🙏🙏