Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या शिखर संस्थेला९/९/२०२१ रोजी बारा वर्षे पुर्ण झाले.
प्रत्येक वर्षी आपन युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांची दखल घेऊन त्यांना संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते पण गेल्या तिन वर्षां पासून पुर परिस्थीती, मग कोरोना लाॉक डाऊन, परत पुर परिस्थीती,सलग संकट आल्यामुळे पत्रकार,व पत्रकारांचे कुटुंबियांच्यासह सर्व सामान्य जनतेला मोठा प्रमाणात पटका बसुन अडचणी आल्याने संघाने सामाजिक बांधिलकी जपत केक कापून साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला.
या प्रसंगी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे आपली मनोगत व्यक्त करताना. युवा पत्रकार संघाचे संपुर्ण महाराष्ट्रात टीमने मदतीसाठी धावून जाऊन कार्य केले आहे.
देशावर ओढवलेल्या अशा संकट काळी मोठ्या प्रमाणात वर्धापन दिन साजरा करणे योग्य होणार नाही.
म्हनून याही वर्षी संघाचे वर्धापन दिन साध्या पद्धतीने केक कापून मुख्य कार्यालयात साजरा करण्याची ठरवले प्रमाणे युवा पत्रकार संघाच्या ९/९/२०२१ रोजी मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे वर्धापन दिन सभासद पदाधिकारी यांच्या तर्फे साध्या पद्धतीने केक कापून उत्साहात शासनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे आपले मनोगतात देशावर कोरोना सारख्या व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराचे संकट समयी युवा पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकारी पत्रकार, न डगमगता खंबीरपणे एकमेकांना साथ देत पत्रकार व पत्रकार कुटुंबीयांसह इतर अनेक गरजूंना शानीटायझर , मास्क, नाष्टा, पाणी, जेवण,व एक महीनाभर पुरेल इतके शिधावाटप करुन एकजूटी, व माणूसकीची प्रचीती दिल्याबद्दल विशेष कौतुक केले.
आजच्या कार्यक्रमाला हितचिंतक, संपादक, कायदेतज्ज्ञ, पत्रकार, संघाचे पदाधिकारी व सभासद यांनी प्रमुख उपस्थिती राहील्याने पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी थोड्याच दिवसात संपुर्ण महाराष्ट्रासह,गोवा, कर्नाटकात संघाचे विस्तार होईल. असा विस्वास मी व्यक्त करतो असे संस्थापक बोलताना म्हणाले.
वर्धापन दिनानिमित्त काही नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आले.
राज्य सदस्य पदी कायदेविषयक सल्लागार म्हणून अँड.संदीप पवार, अँड. भिमराव चौगुले, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी, सांगली जिल्हा अध्यक्ष पदी विकास मगदुम, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी नितीन ढाले,कागल तालुका अध्यक्ष पदी प्रशांत गायकवाड, नियुक्ती करण्यात आले.नुतन पदाधिकारी यांना संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये सहाकार न्युज चे संपादक समीर शेख, न्युज पेपर शोध वार्ता चे संपादक संपत नरके, मिडीया कंट्रोल न्यूज चॅनलचे सह संपादक अजय शिंगे, राज्य कार्याध्यक्ष रतन हुलस्वार, राज्य उपाध्यक्ष समीर जमादार, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कुरणे, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रत्नदिप चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे, प्रदेश उपाध्यक्ष जीतू कळंत्रे , महीला राज्य अध्यक्ष अर्चना चव्हाण, महिला पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मार्था भोसले, प्रदेश सचिव शरद गाडे, तत्कालीन सांगली जिल्हा अध्यक्ष व सध्या राज्य सदस्य प्रवीण मिरजकर, महीला सांगली जिल्हा संघटक नीता पाटील,चि. स्नेहा शिवाजी शिंगे, महीला सदस्य विद्या काकडे, राज्य संघटक विनोद बनसोडे, समीर काझी, आकाश चव्हाण इ. उपस्थित होते, आभार शिवाजी शिरोलीकर यांनी मानले.